गव्हाणे अकॅदमीच्या चार खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्घेसाठी निवड

गव्हाणे अकॅदमीच्या चार खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्घेसाठी निवड
Published on: 
गव्हाणे अकॅदमीच्या चार खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्घेसाठी निवड ---------- विभागीय स्पर्धेत ४ सुवर्ण, ६ रौप्य, ६ कांस्यपदकांची लयलूट सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ७ ः येथील अण्णासाहेब गव्हाणे तायक्वांदो विनर असोसिएशन ऑफ परभणी'' च्या खेळाडूंची शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विभागीय स्पर्धेत या अकॅडमीने चार सुवर्ण, सहा रौप्य आणि सहा कांस्यपदके पटकावली. परभणी येथे झालेल्या शालेय विभागीय तायक्वांदो स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलींच्या गटात ३२ किलो वजनी गटात सर्वज्ञा ज्ञानेश्वर भदरगे हिने, ३५ किलो वजनी गटात श्रेया शशिकांत डोल्हारकर हिने व ६२ किलो वजनी गटात सारा सय्यद अब्दुल रहीम यांनी सुवर्णपदके पटकावली. तर १७ वर्षाआतील मुलांच्या गटात शेख फैजान शेख फिरोज याने ३८ किलो वजन गटाचे सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे या चौघांनी राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच अकॅडमीच्या आयेशा पठाण, उम्मे पठाण, सार्थक सरकटे, सय्यद फरजद, समृद्धी गुजर, विराज देशमुख यांनी रौप्य तर केशव जोगदंड, दृष्टी जोंधळे, मो साकिब, शांतनु शेळके, परिस वाव्हळे यांनी कास्यपदके पटकावली. या खेलाडूंना मो. अखिल चौखरी, संगीता दांडगे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल खेळाडूंचे अकॅडमीचे अध्यक्ष अजय गव्हाणे यांनी अभिनंदन केले. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com