
छत्रपती संभाजीनगर : राज्यात नऊ वर्षांनंतर, तर शहराला पहिल्यांदाच भारतीय भू-तांत्रिक शास्त्रज्ञांची राष्ट्रीय परिषद घेण्याचा मान एमआयटीने मिळविला आहे. ‘जलदगती रेल्वे प्रकल्प आणि त्यासमोरील भू-तांत्रिक आव्हाने’ या विषयावर चौथी इंडो-जपान परिषदपूर्व कार्यशाळा ता. १८ डिसेंबर रोजी, तर भारतीय भू-तांत्रिक परिषद (इंडियन जिओटेक्निकल कॉन्फरन्स) ता. १९, २० आणि २१ डिसेंबर रोजी होत आहे.