पान १ लीड

पान १ लीड
Published on: 
पान १ लीड ------- ABD26J82172 गेवराई ः मिरचीचे क्षेत्र. ABD26J82173 ः घोलप शेतकरी ----- मिरचीच्या ठसक्याने मिळवून दिली समृद्धी ------- - पहिल्याच तोडीत अडीच टन उत्पादन - गेवराईच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग - दोन एकरांतून ८० दिवसांत दोन लाखांची कमाई ---- - पारंपरिक पिकांना फाटा - आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ------ सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २७ : पावसाने दडी मारली, डोळ्यासमोर उभी पिकं करपून गेली, कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा हाच विचार रात्रंदिवस सतावत होता. पण, परिस्थितीपुढे हात टेकले तर कसं जगायचं? मग ठरवलं, जे आहे त्यातच काहीतरी नवं करायचं... हे शब्द आहेत गेवराई तालुक्यातील तळवट बोरगावचे शेतकरी महेश घोलप यांचे. निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल न होता त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मिरची लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आणि अवघ्या ८० दिवसांत दोन एकर क्षेत्रातून दोन लाखांची भरघोस कमाई करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा या बिकट परिस्थितीतही महेश घोलप यांनी हार मानली नाही. त्यांनी नेहमीच्या पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पीक म्हणून मिरची लागवडीचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी गेवराई तालुक्यातील गडी येथील एका नर्सरीतून एक रुपया २० पैसे प्रतिरोप या दराने ‘तलवार’ वाणाची १५ हजार रोपे खरेदी केली. दोन एकर शेतीत त्यांनी मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर करत शास्त्रोक्त पद्धतीने या रोपांची लागवड केली. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरल्याने कमी पाण्यातही पीक जोमाने वाढले. या लागवडीसाठी त्यांना रोपे, मजुरी, ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर यासाठी सुमारे एक लाख रुपयांचा प्राथमिक खर्च आला. तसेच, दर २-३ दिवसांच्या अंतराने फवारणीसाठी एक ते दोन हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च झाला. योग्य खत व्यवस्थापन आणि नियमित फवारणीमुळे पिकाचे रोगांपासून रक्षण झाले. अवघ्या ८० दिवसांत पीक तोडणीस आले आणि पहिल्याच तोडीत तब्बल अडीच टन (२५ क्विंटल) मिरचीचे उत्पादन त्यांना मिळाले. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ही मिरची विक्रीसाठी नेली असता, मालाची उत्तम गुणवत्ता आणि गडद लालभडक रंग पाहून व्यापाऱ्यांनी सरासरी ८० रुपये प्रतिकिलोचा चांगला दर दिला. यामुळे पहिल्याच तोड्यात घोलप यांच्या हाती दोन लाख रुपयांची रोख रक्कम पडली, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण खर्च निघून ते नफ्यात आले आहेत. ----- पहिल्याच तोडीत अडीच टन उत्पादन महेश घोलप यांनी बाजारात मोठी मागणी असलेल्या तलवार वाणाची निवड केली. योग्य खत व्यवस्थापन आणि नियमित फवारणीमुळे पीक निरोगी राहिले. अवघ्या ८० दिवसांत पहिल्याच तोड्यात त्यांना अडीच टन मिरचीचे घवघवीत उत्पादन मिळाले. मालाच्या उत्तम गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांनी त्यांना सरासरी ८० रुपये प्रतिकिलोचा दर दिला, ज्यामुळे त्यांना एकाच तोडीत दोन लाख रुपयांची कमाई झाली. ------- तलवार वाणाची बाजारात मोठी चलती तलवार जातीची मिरची चवीला अत्यंत तिखट आणि गडद लालभडक रंगासाठी ओळखली जाते. घरगुती मसाल्यांसोबतच ओल्या हिरव्या मिरचीलाही बाजारात मोठी पसंती असते. तिचा दर्जेदार रंग आणि तिखटपणामुळे व्यापाऱ्यांकडून या मिरचीला नेहमीच चांगला भाव मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. ----- पाण्याचा काटेकोर वापर घोलप यांनी दोन एकर शेतीत मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर केला. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले आणि पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळाले. पाणीटंचाईच्या काळातही पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरल्याने कमी पाण्यात पीक जोमदार आले. ----- ((कोट)) शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात अधिक नफा देणारी पिके घेतली पाहिजेत. वर्षभरापासून सुरू असलेल्या विविध प्रयोगांनंतर यंदा मिरची लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला असून, यातून मला अत्यंत चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळाले आहे. - महेश घोलप, प्रयोगशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com