गेवराई पंचायत समितीत एजंटाराज

गेवराई पंचायत समितीत एजंटाराज
Published on
गेवराई पंचायत समितीत एजंटाराज ------- हॉटेलमध्ये बसून चालते लाचखोरी; बीडीओंच्या मनमानीविरुद्ध आंदोलनाचा इशारा ------ बीड, ता. १८ : पंचायत समितीत प्रशासकीय शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला असून, शासकीय कार्यालयात बसण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारी हॉटेलमध्ये बसून आर्थिक व्यवहार व लाचखोरी करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या भ्रष्ट कारभाराविरोधात ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) तक्रार केली आहे. ​गेवराई पंचायत समितीत एफटीओ डाउनलोड करणे आणि विविध शासकीय योजनांच्या मंजुरीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रक्कम वसूल केली जात आहे. कार्यालयात सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नसून, दलाल आणि मध्यस्थांशिवाय एकही फाइल पुढे सरकत नसल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. गटविकास अधिकारी (बीडीओ) बिलगे यांच्या नियुक्तीपासूनच पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. बीडीओंच्याच पाठिंब्यामुळे अधिकारी आणि एजंट निर्ढावले असून, उघडपणे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. ​शासकीय कार्यालयात अधिकारी हजर न राहता खासगी हॉटेलमध्ये बसून अर्थपूर्ण व्यवहार करत असल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरप्रकारांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पंचायत समितीच्या संपूर्ण परिसरात व अधिकाऱ्यांच्या दालनात तातडीने सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. बीडीओ बिलगे यांच्यासह लाचखोरीत लुप्त असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि दलालांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. शेतकऱ्यांची चाललेली लूट तत्काळ न थांबल्यास ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. --- ((कोट)) गटविकास अधिकाऱ्याच्या कारभाराविषयीची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीची पडताळणी केली जाईल. या प्रकरणाची चोकशी केली जाईल व त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - जितीन रहमान, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com