Ghati Hospital : ‘नॉर्मल’ प्रसूतीवर घाटी रुग्णालयाचा भर; ‘सिझेरियन’चे प्रमाण घटते

गोरगरिबांचा आधार असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) प्रसूती विभागात नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण वाढले.
Ghati Hospital
Ghati Hospitalsakal

छ्त्रपती संभाजीनगर - गोरगरिबांचा आधार असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) प्रसूती विभागात नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण वाढत असून, ‘सिझेरियन’चे प्रमाण घटत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

आजघडीला लठ्ठपणा, उशिरा गर्भधारणा या कारणांमुळे ‘सिझेरियन’ झाल्याचे नेहमी ऐकायला मिळते. घाटीतील प्रसूती विभागात मोठ्या प्रमाणावर महिला दाखल होत असतात. असे असताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ‘सिझेरियन’च्या प्रमाणात तीन टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.

मागील वर्षी एकूण दाखल गर्भवतींच्या संख्येपैकी २५ टक्के महिलांचे सिझेरियन करण्यात आले होते. मात्र हे प्रमाण २२ टक्क्यांवर आल्याचे प्रसूती विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

विभागातील डॉक्टर, परिचारिकांकडून योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केली जाते. यावेळी गरोदर महिलेसोबत एक महिला नातेवाईकदेखील दिली जाते. यामुळे नॉर्मल प्रसूती होऊन, सिझेरियनचे प्रमाण घटत आहे.

- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, प्रसूती विभाग

या अडचणी असतील तरच घाटीत ‘सिझर’

  • बाळ आडवे आणि जुळे असेल

  • गर्भपिशवीचे मुख लहान असेल

  • माता हायरिस्क फॅक्टरमध्ये असेल

आजची स्थिती

  • एकूण प्रसूती - ४१

  • नॉर्मल - ३४

  • सिझर - ०७

  • मुले - २२

  • मुली - १९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com