(व्हिडीओ पहा) औरंगाबादेत शासकीय रुग्णालयांचा साडेबाराशे स्टाफ संपावर : रुग्णसेवेवर परिणाम (या आहेत मागण्या)

Ghati Staff On Strike news Aurangabad
Ghati Staff On Strike news Aurangabad

औरंगाबाद : जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण रद्द करा यासारख्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात नर्सेस फेडरेशन व शासकीय कर्मचारी संघटनेच्या घाटी रुग्णालयातील परिचरिकांनी सहभाग घेतला आहे. तर इंटक व राज्य कर्मचारी संघटनेचे सुमारे चारशे कर्मचारी संपात सहभागी झाले. तर कंत्राटी कर्मचारीही ऐनवेळी संपात सहभागी झाल्याने रुग्णालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे.

घाटी रुग्णालयासह शासकीय कर्करोग रुग्णालयात सुमारे साडे आठशे परिचारिका काम करतात. त्या सर्व 100 टक्के या संपात सहभागी आहेत. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यासाठी पन्नास परिचरिकांचे पथक तयार असून ते सेवा देईल. असे परिचरिका संघटनेच्या नेत्या इंदुमती थोरात म्हणाल्या.यावेळी शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शुभमंगल भक्त, सरचिटणीस कुंदा पानसरे, कार्याध्यक्ष द्रौपदी कर्डीले, कोषाध्यक्ष कालिंदि इधाटे, वंदना कोळनुरकर, मीना राठोड, हेमलता शुक्ला, महेंद्र सावळे, प्रवीण व्यवहारे, मकरंद उदयकार, दत्ता सोनकांबळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

रुग्णालयात रुग्णसेवेसाठी प्रशासनाने शिकाऊ परिचारिका विद्यार्थ्यांना वार्डात पाचारण केले आहे. 24 तास हा संप चालणार असल्याने दरम्यान, रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेश हरबडे म्हणाले.


ओपीडी केली सुरू
प्रभारी अधिष्ठाता डॉ कैलास झिने व वैद्यकीय अधीक्षक डॉ सुरेश हरबडे यांनी घाटीची ओपीडी सुरू करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत नोंदणी सुरू केली. बंद दालनाच्या चाव्या संपावरील कर्मचाऱ्यांकडे असल्याने दालने उघडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तर कंत्राटी कर्मचारी वेळेवर संपाचे कारण देत कामावर जात नसल्याने डॉ झिने यांनी त्यांना खडसावले. व कामावर जा नाहीतर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. दरम्यान साडे नऊ वाजता ओपीडी सुरळीत सुरू झाली.

कर्मचारीही संपावर
इंटक व राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे कामरचारीही संपात सहभागी आहेत. दरम्यान कंत्राटी कर्मचारीही कामावर गेले नसल्याने घाटी रुग्णालयाच्या कामावर सकाळ पासूनच परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सुरेश आहेरकर, रवींद्र दाभाडे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी घाटीत घोषणाबाजी केली.यावेळी इंटकचे अशोक जाधव, मुकेश भोंगे, नथुराम काथे, गुलाबसींग लाहोट, अख्तर बेगम नासिर खान, विजय परदेशी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com