कर्णबधिर मुलगी झाली इंजिनिअर; आईने उलगडला संघर्षाचा जीवनप्रवास

‘मानसी’च्या आईने उलगडला संघर्षाचा जीवनप्रवास
‘मुलगी जन्मताच कर्णबधिर असल्याचे तीन महिन्यांनंतर समजले तर, सर्वांनाच धक्का बसला. ऐकू येत नसल्यामुळे बोलताही येणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र, आई...
‘मुलगी जन्मताच कर्णबधिर असल्याचे तीन महिन्यांनंतर समजले तर, सर्वांनाच धक्का बसला. ऐकू येत नसल्यामुळे बोलताही येणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र, आई...

औरंगाबाद : ‘मुलगी जन्मताच कर्णबधिर असल्याचे तीन महिन्यांनंतर समजले तर, सर्वांनाच धक्का बसला. ऐकू येत नसल्यामुळे बोलताही येणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र, आई ऊर्मिला यांनी जिद्द सोडली नाही. मुलीला किमान बोलता यावे, यासाठी परिश्रम घेतले. यात यश आले. मुलीने शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेऊन इंजिनिअर झाली.’ ही संघर्षगाथा मानसीच्या आई ऊर्मिला गायकवाड आगरकर यांनी उलगडली.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे रविवारी (ता. १३) ऑनलाइन कार्यक्रम झाला. यात ‘मनी मानसी’ ग्रंथाच्या लेखिका ऊर्मिला गायकवाड आगरकर यांनी संवाद साधला. यावेळी कर्णबधिर मानसीदेखील उपस्थित होती. श्रीमती आगरकर म्हणाल्या, मानसी ऐकू, बोलू शकणार नसल्याचे समजले. तेव्हा तिला बोलण्यासह शिकविण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी तिला शब्द उच्चारण्यास शिकवायला सुरुवात केली. पहिला शब्द आई हा शिकवला. जेव्हा तो शब्द म्हणाला तेव्हा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर बाबा, आजोबा असे अनेक शब्द उच्चारले. सुरुवातीच्या दोन वर्षांत ती प्राणी, फळ, नातेवाइकांना ओळखायला लागली. सव्वातीन वर्षांची असताना पुण्यात उपचार घेतले. त्यानंतर मुंबईतील एका शाळेत मानसीला घातले. त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाचा भार वडिलांनी उचलला. मुंबईतील शाळा संपल्यानंतर सोलापुरात आल्यानंतर सामान्य शाळेत घातले. चार तास शाळा करून त्यानंतर घरी पाच तास अभ्यास घेण्यात येत होता. प्रत्येक अभ्यास हा चार पाच वेळा करून घ्यावा लागत होता. १५ वर्षे कधीही सुटी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. समिता जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शशिकांत पाटील यांनी केले. डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी आभार मानले.

अन् ती डिस्टिंग्शनमध्ये आली

मानसीला दहावीत ८१ टक्के मिळाले. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यामुळे अभियांत्रिकीच्या पदविकेला प्रवेश घेतला. त्यात ७८ टक्के गुण मिळवले. त्यानंतर अभियांत्रिकीच्या पदवीला प्रवेश घेतला. ९१ मुलांमध्ये ४० मुले पहिल्या वर्षी नापास झालेले असताना ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. तेव्हा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तिच्या हस्ते झेंडावंदन केले. अभियांत्रिकीची पदवी ती डिस्टिंग्शनमध्ये उत्तीर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com