esakal | पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य
sakal

बोलून बातमी शोधा

अंजली जाधव

ती खुप हुशार व शांत स्वभावाची असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला शिकण्याची इच्छा असल्याने व तिला शिक्षक बनण्याची इच्छा असल्याने तिचे शिक्षण सुरू ठेवले. परंतु यंदा कोरोनामुळे शिक्षण कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सुरू असल्याने काही अंशी गोंधळली होती.

पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : गुरुजी बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पैठण Paithan येथील अध्यापक विद्यालयात डी.एडच्या द्वितीय वर्षात शिक्षण Education घेणाऱ्या पाचोड (ता.पैठण) येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एकवीस वर्षीय अविवाहित तरुणीने आई-वडील घराबाहेर अंगणात बसले असता आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. तीन) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. अंजली काकासाहेब जाधव असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. मात्र या आत्महत्याग्रस्त भावी शिक्षिकेने आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात केवळ पप्पा, मला माफ करा, कुणालाही दोष देऊ नका, असा मजकूर लिहिलेला आहे.पाचोड येथील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत सहशिक्षक काकासाहेब जाधव यांची मुलगी अंजली जाधव (वय २१) ही पैठण येथील अध्यापक महाविद्यालयात Education College डी.एड.च्या D.ed द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती खुप हुशार व शांत स्वभावाची असल्याने तिच्या आई-वडिलांनी तिला शिकण्याची इच्छा असल्याने व तिला शिक्षक बनण्याची इच्छा असल्याने तिचे शिक्षण सुरू ठेवले. परंतु यंदा कोरोनामुळे शिक्षण कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन सुरू असल्याने काही अंशी गोंधळली होती. तिने शनिवारी (ता.तीन) रात्री कुंटुबातील सर्व सदस्य जेवण करून गरम होत असल्याने घरासमोरील चबुतऱ्यावर बसले असता अंजलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने आईवडील व अन्य सदस्य झोपण्यासाठी घरात आले असता अंजलीने गळफास लावल्याचे दिसले. समोरील दृश्य पाहुन सर्वांनी हंबरडा फोडला.girl committed suicide in pachod in aurangabad district

हेही वाचा: पत्रकार सुभाषचंद्र वाघोलीकरांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली व अंजलीला तातडीने पाचोड Pachod येथील ग्रामीण रुणालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, जमादार किशोर शिंदे, सुधाकर मोहिते आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात Pachod Police Station आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहिते, पवन चव्हाण करित आहेत. अद्यापपर्यंत अंजलीच्या आत्महत्येविषयीचे नेमके कारण समजु शकले नाही.

loading image
go to top