Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तील साठा आता पन्नास टक्क्यांवर
Godavari Flood: नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, जायकवाडी धरणाचा साठा ५०.५७ टक्यांवर पोहोचला आहे. २२ धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे जलसाठा वेगाने वाढतो असून, धरण प्रशासनाने पूर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
पैठण : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. पुराचे पाणी दाखल होत असल्याने जायकवाडी (नाथसागर) धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. रविवारी (ता. सहा) धरण निम्मे भरले.