‘गोकुळनाथ’च्या दोन संघांची
विभागीय रग्बी स्पर्धेसाठी निवड
परभणी, ता. ८ ः पिंगळी येथील गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १७ व १९ वर्षाआतील मुलींच्या संघांनी जिल्हा अजिंक्यपद मिळविले. त्यामुळे या दोन्ही संघांची शालेय विभागीय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शालेय जिल्हास्तरीय रग्बी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत प्रशालेच्या १७ व १९ वर्षाआतील मुलींच्या संघांनी जिल्हा अजिंक्यपद पटकावले तर १७ व १९ वर्षाआतील मुलांच्या संघांनी उपविजेतेपद प्राप्त केले. विजेत्या मुलींच्या संघात श्रद्धा मोरे, नेहा जहाने, चैताली सावंत, श्रावणी शिंदे, आकांक्षा तिथे, मनीषा कोल्हे, अनुराधा आव्हाड, आरती आव्हाड, सिद्धेश्वरी चव्हाण, साक्षी आगलावे, अक्षरा ननेर, मुक्ता साखरे, राजनंदनी ढोले, गार्गी ढोमे, साक्षी साखरे, साक्षी दामोदर, पायल उगले, हर्षदा नावळे, आरती लोखंडे, पायल राठोड, आदिती गरुड, तनिष्का नाईकवाडे, त्रिशाली कदम, अक्षरा लोखंडे, यांचा समावेश होता तर उपविजेत्या मुलांच्या संघात गणेश आवरगंड, सूरज पवार, सोहम आव्हाड, श्रवण आव्हाड, कपिल ठेंगे, सूरज भालेराव, प्रणव देशमुख, चंद्रकांत कदम, हनुमान चव्हाण, प्रथमेश गवते, रोहन कांबळे, विठ्ठल साखरे, आकाश ससाने, विजय भालेराव, करण सोनकांबळे, विशाल शिंदे, करण जाधव, शंतनू अंभोरे, करण आव्हाड, कुणाल काकडे, कोंडीबा राहटकर, राज खंदारे, अमित चव्हाण, रुपेश कांबळे यांचा समावेश होता. या संघांना क्रीडा शिक्षक शिवाजी काकडे यांची मार्गदर्शन केले.
--------------