गोकुळनाथ विद्यालयाचे विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी ५१ खेळाडू पात्र

गोकुळनाथ विद्यालयाचे विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी ५१ खेळाडू पात्र
Published on: 
गोकुळनाथ विद्यालयाचे ५१ खेळाडू ठरले पात्र ----------- विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १७ ः पिंगळी येथील गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ५१ खेळाडू शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेवर प्रशालेच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले. विविध वयोगट व विविध प्रकारातून प्रशालेच्या ५१ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. यामध्ये धनंजय बनसावडे, कृष्णा कदम,आनंद गायकवाड, शिवराज अंभोरे,भारती तेलगड, अंकिता तेलगड, युवराज राठोड, साईराम जैस्वाल, कृष्ण राऊत, आकाश ससाने, साक्षी साखरे, साक्षी दामोदर , आकांक्षा तिथे, अक्षरा लोखंडे, सोहम आव्हाड, सुरज पवार,, विठ्ठल साखरे, पायल उगले, आरती लोखंडे, गौरी गरुड, गजानन भुमरे, सटवाजी मिरासे, बुद्धपाल परसोडे, वेदिका कोरडे ,शेख माहीन, धनश्री राऊत, अर्जुन भवर, करण पांचाळ, शेख आयान वल्ली, सिद्धेश्वरी चव्हाण, आदिती गरुड, श्रद्धा मोरे, प्रणव देशमुख, हनुमान चव्हाण, सुरज भालेरावय, हर्षदा नावळे, मनीषा कोल्हे, अक्षरा ननेर, मानव काळे, आदित्य लोखंडे, स्वराज पांचाळ, रवी चांदणे, नवनिता तेलगड, शिवानी तेलगड, साक्षी जोंधळे, संध्या गायकवाड, गोविंद जाहणे, ऋषिकेश देशमाने, शंतनु अंभोरे, राजनंदनी ढोले, गार्गी डोमे साक्षी आगलावे, प्रीयंका जोगदंड, पुरुषोत्तम वाकोडे, विजय भालेराव, कुणाल काकडे, त्रिशाली कदम, राणी गवारे, शरयू चव्हाण, तनिष्का नाईकवाडे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक शिवाजी काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com