सोने-चांदीचे मार्केट स्लो; शेअर बाजाराकडे नजरा, सराफा पेठेला ग्राहकांची प्रतीक्षा

Gold-Silver Market : फेब्रुवारी आणि एप्रिलदरम्यान सोन्याने भरारी घेतली होती. या कालावधीत सोन्याने १८ टक्क्यांची रेकॉर्डब्रेक भरारी घेतली.
Gold-Silver Market
Gold-Silver MarketSakal
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : लग्नसराई आणि सणासुदीचे दिवस नसल्याने सध्या सराफा बाजारात खरेदीदार कमी झाले आहेत. शेअर बाजाराने भरारी घेतली नाही तर पुन्हा दर वाढतील आणि शेअर बाजार वधारला तर किमती थोड्याफार कमी होतील, असे सराफांचे म्हणणे आहे. दरात वाढ नसल्यामुळे सध्यातरी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत तोळ्याला रुपये ७२,८०० असून जीएसटीसह ७४ हजार २४२ रुपये इतकी आहे. चांदी ९०,५०० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. तर जीएसटीसह ९३ हजार २०० रुपये इतके दर आहेत. २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६,३१३ रुपये प्रति १० ग्रॅम तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ५५,३३० प्रति १० ग्रॅम आहे.

फेब्रुवारी आणि एप्रिलदरम्यान सोन्याने भरारी घेतली होती. या कालावधीत सोन्याने १८ टक्क्यांची रेकॉर्डब्रेक भरारी घेतली. सोने आता ७२,८००-७४, २४२ रुपयांच्या जवळपास मजबूत होत आहे. या कालावधीत सोने १२,००० रुपये प्रति १० ग्रॅमने वधारले. बाजारातील परिस्थिती पाहता सोने येत्या एक ते दोन महिन्यात ७० हजार रुपयांपर्यंत येईल.

२०२४ च्या शेवटच्या तिमाहीत सोने पुन्हा उसळी घेण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वर्षाच्या अखेर सोने ७५,००० रुपये ते ७७,००० रुपयांपर्यंत उसळी घेण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. चीनसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी थांबविल्याने जून महिन्यात सोन्याच्या दरात मोठी उसळी दिसली नाही.

२२-२४ कॅरेटमध्ये काय फरक?

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते, की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. २४ कॅरेट सोने ९९.९ टक्के शुद्ध असते आणि २२ कॅरेट अंदाजे ९१ टक्के शुद्ध असते.

Gold-Silver Market
Gold Silver Rate : चांदीत 1100 ची घट, सोन्यात 700 रुपयांची वाढ

२२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंचे ९ टक्के मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सध्या सराफा मार्केट थंड आहे. सिझन नसल्यामुळेही खरेदीदार नाही. सोने-चांदीच्या दरात किंचित वाढ होत आहे. शेअर मार्केट वाढले नाही तर दर वाढतील. शेअर मार्केट वाढले तर दर थोडेफार कमी होतील.

- विजय तिवारी, सराफा व्यापारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.