Air Travel Boost for Dharashiv District as Airport Transfer is Approved
sakal
धाराशिव : राज्य शासनाच्या मंगळवारच्या (ता.३०) निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून धाराशिव विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कंपनी विमानतळाचा विकास, विस्तार करण्यासह विमानसेवेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातून विमानसेवा सुरू होण्यास चालना मिळाली आहे.