मुख्यमंत्री साहेब, पाच हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा!

मुख्यमंत्री साहेब, पाच हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा!
Published on: 
हिंगोली ः गोरेगाव (ता. सेनगाव) येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाच हजार रूपयांचा धनादेश पाठविला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी. साहेब, पाच हजारांत तुम्हीच दिवाळी करून दाखवा! गोरेगावच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनाच पाठविला पाच हजारांचा धनादेश हिंगोली, ता. १६ : राज्य सरकारकडून दिवाळीसाठी देण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचे म्हणणे मांडत सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.१६) मदतीच्या रकमेचा पाच हजार रुपयांचा धनादेश थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टाद्वारे पाठविला. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, साखर, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत मिळालेल्या पाच हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाची दिवाळी कशी साजरी करायची? मुलांना नवीन कपडे कसे घ्यायचे? आणि फराळाची तयारी कशी करायची? असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. शेतीचा वाढता खर्च, पावसाच्या दडीमुळे पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकट यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यात दिवाळीसारखा महत्त्वाचा सण साजरा करण्यासाठी मिळणारी मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? असा सवाल करत शेतकऱ्यांनी सरकारने ठोस आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com