(ABD26J82447 कात्रण)
--------
ABD26J82446
(((फोटो ओळ))) छत्रपती संभाजीनगर ः गौण खनिजाच्या चोरीप्रकरणी पाहणी करताना गणेश सोनवणे यांच्यासह इतर.
-----
अखेर महसूल विभागाला दिसली डोंगरचोरी
----
मलाईदार पट्टी सारली दूर; कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना
----
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३१ ः मिटमिटा भागातील डोंगर कापून मुरूम चोरी होत होती. मात्र, ‘मलाईदार पट्टी’मुळे महसूल विभागाला ही चोरी दिसत नव्हती. याबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. ३०) बातमी प्रकाशित केली. त्यामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला. मुरमाची चोरी करणाऱ्या माफियांना नोटीस बजावण्यात आली असून, परवानगीचे कागदपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय कापलेल्या डोंगराचा मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी पंचनामा केला.
मिटमिटा परिसरात मोठ्या प्रमाणात गायरान आणि वन विभागाची जमीन असून, हा भाग निर्मनुष्य असल्याचा फायदा घेत गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांनी मिटमिटा परिसराकडे मोर्चा वळविला आहे. गट नंबर ५६ व गट नंबर ३०६ मध्ये मुरूम चोरण्यासाठी जेसीबीच्या मदतीने बेसुमार खोदकाम केले जात होते. डोंगर कापून त्यातून निघणारा मुरूम रस्त्यांची कामे, खासगी बांधकामे आणि बांधकाम व्यावसायिकांना विक्री करण्याचा सपाटा सुरू आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महसूल विभागाचे पथक शुक्रवारी (ता. ३०) दुपारी मिटमिट्यात पोचले. गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेऊन आतापर्यंत किती खोदकाम करण्यात आले आहे. त्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे का? याची तपासणी करण्यात आली. परिसरात शेतकऱ्यांकडे विचारपूस केली असता, त्यांना दीपक बनकर हे मुरूम चोरी करत असल्याची माहिती दिली. त्यावर संबंधिताला नोटीस बजावण्यात आली. माझ्याकडे गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी असल्याचा दावा संबंधिताने केला. त्यावर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-------
((कोट))
मिटमिटा शिवारातील गट नंबर ५६, ५९ मध्ये गौण खनिजाची चोरी झाल्याचे आमच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यानुसार पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना पाठविण्यात आला. संबंधिताने आपल्याकडे परवानगी असल्याचा दावा केला आहे. त्यांना कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल.
- गणेश सोनवणे, मंडळ अधिकारी