शासकीय नोकरीतील ५ टक्के आरक्षणासाठी पात्र खेळांची यादी जाहीर

शासकीय नोकरीतील ५ टक्के  आरक्षणासाठी पात्र खेळांची यादी जाहीर
Published on: 
शासकीय नोकरीतील आरक्षणासाठी शासनाकडून पात्र खेळांची यादी लातूर, ता. ४ : राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षणाचे धोरण लागू करण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण नेमक्या कोणत्या खेळांसाठी लागू आहे, याबाबत खेळाडू तसेच नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पात्र खेळांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार २००५ ते २०२८ या कालावधीत सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समाविष्ट असलेले खेळ, तसेच देशी व लोकप्रिय खेळांचा या आरक्षणात समावेश करण्यात आला आहे. आरक्षणासाठी पात्र ठरलेल्या खेळांमध्ये जलक्रीडा, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनो/कयाक, सायकलिंग, घोडेस्वारी, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, मॉडर्न पेंटॅथलॉन, रोईंग, सेलिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, गोल्फ, रग्बी सेव्हन्स, स्केटबोर्डिंग, सर्फिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, बुद्धिबळ आणि क्रिकेट या ३६ खेळांचा समावेश आहे. क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लॉकचेन वर आधारित ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्राविण्यप्राप्त खेळाडूंनी आपल्या क्रीडा प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी या अत्याधुनिक प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.