CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची घोषणा; बंद असलेल्या संचांना पर्याय, परळी औष्णिक वीज केंद्रामध्ये सौर प्रकल्प
Parli Solar Power Project : परळी औष्णिक वीज केंद्रातील बंद झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागी आता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा करत हरित ऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याचे स्पष्ट केले.
CM Fadnavis Announces Solar Power Project at Parliesakal
परळी वैजनाथ : येथील औष्णिक वीज केंद्रातील बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.