Grishneshwar Temple : श्रावणातील प्रत्येक सोमवारी; वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर २४ तास राहणार खुले
Shraavana 2025 : श्रावणातील प्रत्येक सोमवारसाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांची सोय आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे.
खुलताबाद (जि. छत्रपती संभाजीनगर) : श्रावणातील प्रत्येक श्रावणी सोमवारनिमित्त वेरूळ (ता. खुलताबाद) येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.