ज्ञानेश कुमारांना पदावरून हटवा
---
मुखेड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, केंद्र सरकारला निवेदन
------------
मुखेड, ता. १३ (बातमीदार) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांना पदावरून हटवावे आणि एस.आर.आय. प्रक्रिया तातडीने रद्द करावी, या मागणीचे निवेदन मुखेड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. खासदार रवींद्र चव्हाण व माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड आणि तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
स्वायत्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया हा भारतीय लोकशाहीचा मुख्य आधार आहे. भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिला आहे. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या काही निर्णयांमुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुखेड काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक माधवराव पाटील उन्द्रीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शिवलींगराव पाटील कामजळगेकर, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर, बालाजी खांडेकर, सुनील पाटील आरगीळे, प्रकाश निमलवाड, बालाजी वाडेकर, सुनीता जाधव, बालाजी वारे, हौगिराव नंदगावकर, बाळासाहेब पुंडे, एम. आर. गोपणर, संदीप सुडके, जयपाल गायकवाड, रमेश तेलंग हिप्परगेकर, विश्वभर देवकत्ते, बबन शिंदे, शंकर लुट्टे, शेख इब्राहीम, राजू बनसोडे आणि हाफीज पठाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.