गंगापूर येथे जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

गंगापूर येथे जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.
Published on
खेळ व खेळाच्या चिकाटी मुळे आपल्या भविष्याला योग्य ती दिशा मिळण्यास मदत होते,जानवी शेखर. गंगापूर येथे जिल्हास्तरीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न. गंगापुर बातमीदार ता.२० रामेश्वर अमृते.. गंगापूर येथील न्यू हायस्कूल व श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ता.२० सप्टेंबर रविवार रोजी क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १४,१७, व १९ वयोगटातील मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धा मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर यांच्या प्रांगणामध्ये उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेसाठी जिल्हाभरातून ३० पेक्षा अधिक संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी जानवी शेखर या उपस्थित होत्या त्यांनी बोलताना खेळ हा आपल्या जीवनातला किती महत्त्वाचा घटक आहे हे पटवून दिले खेळातूनच आपले भविष्य घडत असते खेळाच्या चिकाटीमुळे आपण आपल्या आयुष्याची यशस्वी वाटचाल करतो असं प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव तसेच जिल्हा हँडबॉल व हॉलीबॉल संघटनेचे डॉ.आबासाहेब शिरसाठ, तालुका क्रीडा अधिकारी रेखा परदेशी,रमेश सोनवणे,प्रा. फेरोज सय्यद,तालुका समन्वयक निलेश माने , छावाचे उद्धव काळे, जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे प्रा उदय तगरे,अमिन पटेल,रामदास सारसर, प्रमोद महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी,प्रवीण पुलाटे,अंबादास उंडरे, महमूद पठाण,अब्दुल बागेस,अली बकोदा,प्रवीण बर्फे, मुकतार शेख, जुनेद शेख,शैलेश सोनवणे,प्रसाद सूर्यवंशी, जुबेर बागवान,अक्षय जोशी,श्रीकांत शिंदे आदीनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com