अहंकाराच्या विनाशाची साक्ष

अहंकाराच्या विनाशाची साक्ष
Published on
वीस फूट उंचीवरून उडतोय हनुमान! ‘धाराशिवच्या महाराजा’च्या मंडळात ‘लंका दहन’चा जिवंत देखावा ----- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २० : स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा वारसा जपणारे, गवळी गल्लीतील ‘धाराशिवचा महाराजा’ म्हणून ख्याती प्राप्त ‘मानाचा गणपती - श्री बाल हनुमान गणेश मंडळ’ यंदाच्या गणेशोत्सवात एक भव्य आणि जिवंत कलाविष्कार घेऊन आले आहे. रामायणातील सुंदरकांडातील अत्यंत रोमांचक असा ‘लंका दहन’ देखावा मंडळातर्फे साकारण्यात आला आहे. देखाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी बाजारातून कोणतीही मूर्ती किंवा देखावा विकत आणलेला नाही. ‘गुणवंत कामगार’ पुरस्कारप्राप्त व एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी, तसेच व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू काशीनाथ दिवटे (वय ६२ ते ७८ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ) आणि संजय पाळणे, सचिन बुरुंग, विश्वास दळवी, वरुण साळुंखे व दुर्गेश दिवटे यांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय, केवळ निष्काम सेवाभावाने हा देखावा उभारला आहे. दिवटे यांनी स्वतःच्या उपजत बोटांच्या जादूने बिनसाच्याची अत्यंत आकर्षक मूर्ती साकारली आहे. आकाशातून उडणारे हनुमान देखाव्यात २० फूट उंचीवरून आणि ४० फूट लांबीवरून श्री हनुमान आकाशातून उडत येत असल्याचे आणि रावणाच्या अहंकारी सोन्याच्या लंकेला आग लावत असल्याचे थरारक दृश्य हलता देखाव्याच्या तंत्रज्ञानाद्वारे दाखवण्यात आले आहे. माता सीतेचा शोध, अक्षयाचा वध, मेघनाथाचे ब्रह्मास्त्र, बिभीषणाची मध्यस्थी आणि हनुमानाच्या पेटवलेल्या शेपटीने रावणाची लंका भस्मसात होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रसंग यात जिवंत होतो. असुरी वृत्तीच्या विनाशाचा संदेश रावणाचा अहंकार आणि गर्व कसा संपूर्ण विनाशाला कारणीभूत ठरतो, हे स्पष्ट करतानाच समाजमन सुसंस्कृत व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. माणसातील राक्षसी, दानाविक, अन्यायी व स्वार्थी विचारसरणी नष्ट होऊन समाजात चांगल्या संस्कारांची जपणूक व्हावी, हा संदेश या देखाव्यातून दिला जात आहे. मान्यवरांच्या हस्ते पूजा मंडळाच्या श्रींच्या पूजाविधीसाठी आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांच्या सन्मानासाठी जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पूजार, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर तसेच माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले. ----- धाराशिव : गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाचा लंका दहन देखावा. फोटो क्रमांक : OSM26B07043

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com