घरावरचे झेंडे उतरलेच नाहीत : प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांची बगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Tiranga Activity

घरावरचे झेंडे उतरलेच नाहीत : प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांची बगल

औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. १५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी घरावरील झेंडे काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते; पण अद्याप असंख्य घरावर ध्वज कायम असून, प्रशासनाच्या आवाहनाचा नागरिकांना विसर पडला आहे.

उपक्रमात सहभागी नागरिकांनी इमारती, घरांवर ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करून तिरंगा ध्वज उभारावा असे आवाहन करण्यात आले होते. या मोहिमेसाठी महापालिकेने सव्वालाख झेंड्याचे वाटप केले तर नागरिकांनी स्वतः खरेदी करून आपल्या घरावर झेंडे लावले. या मोहिमेसाठी नियमावली तयार करण्यात आली होती. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा याबाबत कार्यालयांना ध्वजसंहिता पाळावी लागेल. ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा. प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये.

अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करून ठेवावा यासह इतर नियमावली तयार करण्यात आली पण अनेकांनी १६ ऑगस्टनंतरही ध्वज काढून घेतला नाही. काहींनी वाहनांवरचेही ध्वज काढलेले नाहीत. जोरदार वाऱ्यामुळे हे ध्वज खराब होण्याची शक्यता आहे.

१५ ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी ध्वज काढून तो घडी करून कपाटात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार अनेकांनी नियमांचे पालन केले. पण काही जणांच्या घरावर ध्वज काढण्याचे राहून गेले असतील तर ते काढून घ्यावेत.

-बी. बी. नेमाने, अतिरिक्त आयुक्त महापालिका.

Web Title: Har Ghar Tiranga Campaign Flags On House Did Not Come Down Citizens Appeal Administration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..