कुंभार पिंपळगावात आजपासून

कुंभार पिंपळगावात आजपासून
Published on: 
कुंभार पिंपळगावात आजपासून हरिनाम सप्ताह कुंभार पिंपळगाव, ता. १२ (बातमीदार) : गेल्या २८ वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला शुक्रवारी (ता. १३) मिरवणुकीने प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी (ता.२०) काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संगीत रामायण, काकडा, भजन, विष्णुसहस्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन आणि जागरण अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शुक्रवारी महादेव महाराजगिरी, शनिवारी बाळासाहेब महाराज शिंदे, रविवारी महादेव महाराज राऊत, सोमवारी ज्ञानेश्वर महाराज शिंदे, मंगळवारी एकनाथ महाराज शास्त्री, बुधवारी एकनाथ महाराज माने, तर गुरुवारी उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळी विशाल महाराज खोले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. दरम्यान, अनिरुद्ध महाराज आधुडे यांची रामकथा आणि दत्ता महाराज टरले यांचा भारुडाचा कार्यक्रमही होणार आहे. गुरुवारी (ता. १९) गावातून दिंडी प्रदक्षिणा काढण्यात येणार असून, त्यानंतर दीपोत्सव साजरा केला जाईल. सप्ताहासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्री चहापाण्याची व्यवस्था गावातील दानशूर व्यक्तींच्या वतीने करण्यात आली आहे. ----- तरुणांचा पुढाकार सप्ताहाच्या आयोजनाची जबाबदारी तरुणांनी घेतली आहे. गावातील विविध समाजांतील आणि घरांतील तरुण उपक्रमात सहभागी झाले आहेत. भजन, कीर्तन आणि प्रवचनातही त्यांचा सहभाग असून, तरुणांच्या योगदानातून हा सप्ताह पार पडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.