esakal | 'शेकटा-शेंद्रा रस्त्यातील खड्डे बुजवा अन्यथा टोल नाका बंद करणार'
sakal

बोलून बातमी शोधा

haribhau bagade

'शेकटा-शेंद्रा रस्त्यातील खड्डे बुजवा अन्यथा टोल नाका बंद करणार'

sakal_logo
By
- प्रकाश बनकर

औरंगाबाद: औरंगाबाद-जालना रोडवरील शेकटा ते शेंद्रादरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यात रोज किरकोळ छोटा-मोठा अपघात होत आहे. याविषयी टोलधारक कंपनी सांगूनही त्यांच्यातर्फे कुठलेच उपाययोजना करण्यात येत नसल्याने काही संतप्त नागरिकांनी शुक्रवारी (ता.१६)थेट आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे तक्रार दिली. त्या वेळी आमदार बागडे यांच्यातर्फे ठेकेदार कंपनीला खड्डे बुजवा अथवा दोन दिवसात तुमचा टोल नाका बंद पाडू, असा इशारा दिला.

खड्ड्यांमुळे कंटाळलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.१६) पोती आणून त्या खड्ड्यात टाकली व थेट आमदार बागडे यांची भेट घेत तक्रार केली. यावेळी आमदार बागडे यांनी हा इशारा दिला. यावर कंपनीतर्फे खड्डे लवकर बुजविण्यात येतील, असे सांगण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन पठाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रामबाबा शेळके, रामकृष्ण भोसले व तालुक्याचे अध्यक्ष सज्जन भाऊ बागल उपस्थित होते.

loading image