ऊसतोड कामगारांच्या पालांवर आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ऊसतोड कामगारांच्या पालांवर आरोग्य विभागाची विशेष मोहीम
Published on: 
दोन कॉलम ऊसतोड कामगारांच्या पालांवर आरोग्य विभागाची विशेष मोहीम बालकांसह गर्भवती महिलांची तपासणी; जननी पोर्टलवर नोंदणी करून मोफत उपचार सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. १७ : ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने साखर कारखान्यांच्या परिसरात तसेच शेतशिवारात तात्पुरत्या पालांमध्ये वास्तव्यास आलेल्या उसतोड कामगारांच्या कुटुंबांसाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी तसेच गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी करून त्यांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पत्रानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणांना याबाबत निर्देश दिले आहेत. बालकांची जन्मजात दोष, आजार, पोषणातील कमतरता आणि विकासातील विलंब या निकषांवर तपासणी करून आवश्यक उपचार व संदर्भसेवा उपलब्ध केली जाणार आहे. गर्भवती महिलांची स्वतंत्र नोंदणी करून जननी पोर्टलवर माहिती अद्ययावत केली जाईल. हिमोग्लोबिन, रक्तदाब, रक्तातील साखर, सोनोग्राफी आणि एचआयव्ही तपासणीसह लोह-कॅल्शियमच्या गोळ्या व लसीकरणाची सुविधा मोफत मिळणार आहे. अतिजोखमीच्या गर्भवतींचा नियमित पाठपुरावा केला जाणार असून १०८ व १०२ रुग्णवाहिकांद्वारे प्रसूतीसाठी मोफत वाहतूक उपलब्ध असेल. हे सर्वेक्षण ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून ७ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. स्थलांतरित कुटुंबांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.