पिंपरीराजा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पिंपरीराजा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
Published on: 
दर्जेदार आरोग्यसेवेसाठी ६७ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव व सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरीराजा येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाच्या २२ व्या बॅचच्या पहिल्या दिवसाचे प्रशिक्षण झाले. यात ६७ प्रशिक्षणार्थी व नऊ प्रशिक्षक सहभागी झाले. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय) चे अतिरिक्त संचालक दिलीप झा यांनी प्रशिक्षणाला भेट देऊन प्रशिक्षणार्थींच्या ज्ञानाची पडताळणी केली. त्यांच्या प्रतिसादाचे कौतुक करत प्रशिक्षणाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. ‘रिझॉल्व्ह मोअर, रेफर लेस’ या संकल्पनेनुसार प्राथमिक स्तरावरच अधिकाधिक आजारांचे निदान व उपचार करण्यावर भर देण्यात आला. माता-बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, मानसिक आरोग्य, पॅलिएटिव्ह केअर, मौखिक आरोग्य, आपत्कालीन सेवा, योग व आयुषसह १३ घटकांवर मार्गदर्शन झाले. प्रशिक्षणार्थींनी शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत कार्यालयात भेटी देऊन आरोग्यविषयक जनजागृती केली. यावेळी डॉ. पल्लवी पगडाल, डॉ. छाया आवरगावकर, डॉ. विखे पाटील, डॉ. ज्ञानोबा भोसले, डॉ. राणी मुदगल, डॉ. महेश मरकड, डॉ. स्मिता जिघे, डॉ. आशिष वानखेडे, डॉ. प्रतिक्षा नेवसे, सुनील उन्हाळे, सखू शेलार, प्रणाली भांगे, शीतल देशमुख, शिवनाथ तावडे व संदीप पवार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनाथ तावडे व सिद्धार्थ म्हस्के यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com