
छत्रपती संभाजीनगर : एक दोन वर्षांची, तर दुसरी तीन वर्षांची. दोघींनीही एकमेकींचे हात घट्ट पकडलेले. त्यांच्यासोबत ना आई होती, ना बाबा! रात्रीच्या निबिड अंधारात त्यांच्या आयुष्यातच अंधार करून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना रेल्वेस्थानकाजवळील मशिदीसमोर सोडून पळ काढला. त्या शांतपणे उभ्या होत्या. जणू कोणीतरी परत येईल या आशेवर... त्या बोलू शकत नव्हत्या. पण, त्यांचे डोळे सारं काही सांगत होते. भय... निराशा आणि पोरक्या झालेल्या काळजाचं नि:शब्द दु:ख. एका सजग नागरिकाने त्यांना वेदांतनगर पोलिस ठाण्यात नेले. तिथून त्यांना साकार शिशुगृहात पाठवण्यात आले.