esakal | औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी लोटांगण आंदोलन |Aurangabad Farmers Agitation
sakal

बोलून बातमी शोधा

धामोरी बुद्रूक (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद) :  अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांमध्ये सरकारविरुद्ध अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले.

औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी लोटांगण आंदोलन

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदुरवादा (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना (Farmers) हेक्‍टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी (Heavy Rain) खराब झालेल्या पिकांमध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले.

हेही वाचा: टाटा पॉवरच्या स्मार्ट मीटर टेस्टींग लॅबला एनएबीएलची मान्यता

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके, मनोज शेळके, ललित शेळके, अशोक कुटे, नामदेव शेळके, गणेश शेळके, शिवाजी शेळके, राजू शेळके, दिलीप शेळके, डॉ. राजेंद्र शेळके, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर देशमाने, नंदू शेळके, चंद्रकांत शेळके, महेश शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

loading image
go to top