
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या काही भागांत गुरुवारी (ता. २४) रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात बुधवारी (ता. २४) रात्री दमदार पाऊस झाला. हा पाऊस आणि लोहा तालुक्यातील अंतेश्वर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने आवक वाढल्याने शहराची तहान भागविणाऱ्या विष्णुपुरी धरणाचा पाणीसाठा अवघ्या एका दिवसात २३.६८ टक्क्यांवरून तब्बल ८३.६५ टक्क्यांवर पोचला आहे. त्यामुळे टंचाईची भीती आता काहीशी दूर झाली आहे.