Aurangabad Rain : औरंगाबादेत मुसळधार पाऊस,अनेक भागात पाणी

औरंगाबाद - महानगरपालिका मुख्यालयातील झाड कोसळल्याने तीन ते चार वाहनांचा चुराडा झाला आहे.
औरंगाबाद - महानगरपालिका मुख्यालयातील झाड कोसळल्याने तीन ते चार वाहनांचा चुराडा झाला आहे. Aurangabad Rain Updates

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात (Aurangabad) आज मंगळवारी (ता.२८) झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भागात पाणी जमा झाले आहे. काही लोकांच्या घरात, दुकानात पण पाणी शिरले आहे. विद्यानगर वार्डात वेदमंत्रा अपार्टमेंटसमोर तसेच अलंकार सोसायटीमध्ये समर्थ अपार्टमेंटमध्ये (Rain) पाणी घुसले आहे. क्रांती चौक वार्डात सिध्देशनगर भागात देखील नाल्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाणी घुसले होते. त्या भागातील अभियंते नाना पाटील, परदेशी यांना सांगून ताबडतोब जेसीबी यंत्राने नाल्याचा प्रवाह वाहता केल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही.

औरंगाबाद - महानगरपालिका मुख्यालयातील झाड कोसळल्याने तीन ते चार वाहनांचा चुराडा झाला आहे.
Nanded Rain : नांदेडसह जिल्हा झाला जलमय,रात्रीपासून जोरदार पाऊस

शहरातील पावसाचे अपडेट्स

- बायपास बंद. प्रशांती हाॅटेलचा नाला भरून पाणी रस्त्यावर

- नागेश्वरवाडी, दलालवाडी, जाफरगेट, समर्थनगर, गारखेड्यात पाणीच पाणी सुंदरनाला भरून वाहू लागला

- खाम, सुखना नदीला पूर

- सखल भागात झपाट्याने पाणी शिरू लागले....

- बारूदगर नाल्यावरील घरात पाणी...हिमायतबाग परिसरातील नागरिकांचे शाळेत स्थलांतर करण्याची तयारी...

- उल्का नगरीत झाड कोसळले. कैलासनगर येथे घरांमध्ये पाणी शिरले. हर्सूल तलावातून साडेतीन फूट पाण्याचा सांडवा सुरू

- मनपा मुख्यालयातील झाड कोसळले. तीन ते चार वाहनांचा चुराडा

- खाम नदी भरून वाहत असल्याने लोकांची पाणी पाहायला गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com