
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या काही भागांत गुरुवारी (ता. सात) व आज ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात जोरदार सरी कोसळल्या. परभणीच्या जिंतूर, पूर्णा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे दहा महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाचा खरिपाला मोठा आधार मिळाला आहे.