
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात आठवडाभर अधूनमधून होणाऱ्या तुरळक पावसाने श्रावणाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी काहीसे मनावर घेतले. दिवसभर संततधार सुरू होती. गारठाही जाणवला. या हंगामात पहिल्यांदाच पावसाळी वातावरण दिसले. शहरात १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.