Marathwada Rain : ठिकठिकाणी जोरदार बरसला; छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणीत पाऊस
Weather Update : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली व धाराशिव जिल्ह्यांत गुरुवारी सायंकाळी जोरदार ते मध्यम पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागांत गुरुवारी (ता. १२) सायंकाळी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अन्य जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते.