छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांत अतिवृष्टीने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील तब्बल १३० मंडलांत गुरुवारी (ता.२८) अतिवृष्टी झाली. पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून, उभी पिके पाण्याखाली गेल्याने मोठी हानी झाली. नांदेडमध्ये १३२.७ मिलिमीटर, तर लातूरमध्ये ९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.