पुन्हा हेल्मेटसक्ती; दंड पाचशे रुपये, दुसऱ्यांदा मोजा दीड हजार

कार्यालयांमध्ये विनाहेल्मेट आल्यास नो एंट्री
Helmet-rule-breakers
Helmet-rule-breakers

औरंगाबाद : हेल्मेट सक्तीचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले असेल तरच प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. परिवहन आयुक्तांनी याबाबत आदेश काढले असून, अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. आरटीओ आणि पोलिसांतर्फे हेल्मेटबद्दल जनजागृती करावी, त्यानंतर कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच हेल्मेटसक्तीची मोहीम शहरभर राबविली जाणार आहे.

वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. दुचाकी अपघातातील जखमी किंवा मृत्यू पावणारे हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात. त्यामुळेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, राज्यातील प्रत्येक शहरात हेल्मेटला मोठा विरोध होतो हे काही नवीन नाही. त्यामुळे हेल्मेटसक्तीची मोहीम प्रत्येक वेळी बारगळत असते. तरीही कधीतरी लहर आली की आरटीओ आणि पोलिस अचानक हेल्मेटची मोहीम राबवून महसूल गोळा करण्याचे काम केले जाते.

आता मात्र पुन्हा हेल्मेटसक्ती करावी यासाठी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी २२ मार्चरोजी आदेश काढले आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकीचालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये, हेल्मेट नसल्यास कारवाई करावी तसेच जिल्हा प्रशासनातर्फे हेल्मेटचा वापर वाढण्यासाठी प्रबोधन सुरू करावे, या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांनाही सहभागी करून घ्यावे आणि त्यानंतर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

असा आहे दंड

विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्यास पाचशे रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र नवीन मोटर वाहन सुधारणा अधिनियमात पहिल्यांदा विनाहेल्मेट आढळल्यास पाचशे रुपये कायम आहेत. मात्र हाच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com