''तेरणा''च्या सायलीचे स्टार्टअप स्वप्न विद्यापीठात

''तेरणा''च्या सायलीचे  स्टार्टअप स्वप्न विद्यापीठात
Published on
‘हर्बल पेन रिलीफ पॅच’ला इनोव्हेशन कार्यक्रमाची संधी ----- धाराशिव, ता. ७ (बातमीदार) : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभागाची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने तयार केलेल्या ‘हर्बल पेन रिलीफ पॅच’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील (लोणेरे) इनोव्हेशन व इनक्युबेशन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. गुरुवारी (ता. तीन) तिने अभिनव प्रोटोटाइपचे विद्यापीठात सादरीकरण केले. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सादरीकरणाला भेट देऊन सायलीच्या प्रकल्पाची पाहणी केली. आठ औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या वेदनाशामक पॅचची संकल्पना पाहून ते प्रभावित झाले. सायलीच्या कल्पकतेचे कौतुक करत त्यांनी भविष्यात आरोग्योपयोगी पॅचेस बनवणारे स्टार्टअप सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेरणा ट्रस्टचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्टार्टअप संकल्पनेने प्रेरित होऊन सायलीने प्रकल्प साकारला आहे. आमदार पाटील यांनी सायलीचा सत्कार करून प्रोटोटाइपचे यशस्वी स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक मेंटरिंग, नेटवर्किंग व उद्योजकता परिसंस्थेशी जोडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा. डॉ. जी.बी. चिवटे व प्रा. सायली पवार उपस्थित होत्या. ----- OSM26B06939 धाराशिव : ‘हर्बल पेन रिलीफ पॅच’ प्रकल्पाची पाहणी करताना मंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com