Somnath Suryavanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला
Mumbai High Court: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (ता. १४) पोलिस महासंचालकांना दिले.