
छत्रपती संभाजीनगर : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्यावतीने काढण्यात येणाऱ्या तीन विमा पॉलिसी नूतनीकरणास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे. याप्रकरणी खंडपीठात संस्थानचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ॲडहॉक कमिटीच्या वतीने दिवाणी अर्ज दाखल केला होता. यात नमूद केल्यानुसार संस्थानतर्फे संस्थानची मालमत्ता आणि त्यांचे कर्मचारी, संस्थानच्या हॉस्पिटलची मालमत्ता तसेच कर्मचारी व संस्थानमध्ये येणारे भाविक यांच्या अशा तीन पॉलिसी काढण्यात येतात.