'हिजाब गर्ल'च्या सत्कार कार्यक्रमास नाकारली परवानगी,वंचितची कोर्टात धाव

भाजपचा सत्कार कार्यक्रमास विरोध
Muskan Khan
Muskan Khanटिम ई सकाळ

औरंगाबाद : हिजाब गर्ल मुस्कान खान (Hijab Girl Muskan Khan) हिच्या सत्काराच्या कार्यक्रमाला औरंगाबाद पोलिसांनी आज सोमवारी (ता.१४) परवानगी नाकारली आहे. या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारले आहे. या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली असल्याचे सांगितले जात आहे. (Hijab Girl Muskan Khan Facilitation Program Permission Cancelled By Aurangabad Police)

Muskan Khan
Hijab Row: दंगल गर्ल जायराची हिजाबवरुन आगपाखड, हिजाब म्हणजे...

काही दिवसांपूर्वी वंचितकडून हिजाब गर्लचा सत्कार औरंगाबादमध्ये (Aurangabad) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या हस्ते केला जाणार असे जाहीर करण्यात आले होते.तेव्हापासूनच भाजपने या सत्कार कार्यक्रमास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या वतीने जिल्ह्यात मुस्कान खान हिला प्रवेश देऊ नये, यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरण जगभरात गाजले होते.

Muskan Khan
पोलिसांची मोठी कारवाई; मुंबईत १.९५ कोटींचा चरस जप्त, एकाला अटक

मुस्कान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यात महाविद्यालयात हिजाब घालून प्रवेश करताच काहींनी जय श्रीरामच्या घोषणाल दिल्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून मुस्कानने अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com