ABD26J83136
हिंगोली : शहरातील जेतवन बुद्धविहारात नियोजन बैठकीला उपस्थित भंते डाॅ. उपगुप्त महास्थवीर, भंते पंय्यारतन महाथेरो, भंते चंद्रमणी, सुभाष बगाटे, मुळे, राजेश ठोके, नंदकिशोर कांबळे, प्रभू धुळधुळे, प्रकाश इंगोले आदी.
------
जेतवन येथे २ जानेवारीला धम्म परिषद
-
बैठकीत नियोजनावर चर्चा; बौद्ध धम्म प्रवचनासह विविध कार्यक्रम
हिंगोली, ता. १४ : शहरातील शांतीनगर भागातील जेतवन बुद्धविहारात अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन २ जानेवारी २०२७ रोजी करण्यात आले आहे. यंदाची २५ वी धम्म परिषद असून, या अनुषंगाने शुक्रवारी (ता. तेरा) जेतवन बुद्धविहार येथे नियोजन बैठक पार पडली.
शांतीनगरात भंते काश्यप महाथेरो यांनी जेतवन प्रशिक्षण केंद्रात अ.भा. बौद्ध धम्म परिषदेची सुरवात केली. यंदा या परिषदेचे २५ वे वर्ष असून, यात धम्म प्रवचनासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नियोजनासाठी भंते डाॅ. उपगुप्त महास्थवीर (पूर्णा) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस विपश्यनाचार्य भंते पंय्यारतन महाथेरो, भंते चंद्रमणी, भंते धम्मघोष, भंते पंय्यावर्धन, भंते पंय्यामोल, सुभाष बगाटे, मुळे, राजेश ठोके, नंदकिशोर कांबळे, प्रभू धुळधुळे, प्रकाश इंगोले, शालिग्राम अंभोरे, एस.जी. सूर्यवंशी, पी.एम. मकासरे, केशव ठोके, जे.एम. शेवाळे, सुप्रिया महिला मंडळाच्या सुनीता कांबळे, गुंफाबाई पाईकराव, अलकाबाई वानखडे, मनकर्णाबाई चाटसे, रेखा कापुरे, कस्तुराबाई शेवाळे, वच्छाबाई धुमाळे, सुजाताबाई इंगोले, सुमनबाई लोणकर, तिरुमला लोणकर आदींची उपस्थिती होती.