

हिंगोली : होळीचा सण जवळ आल्याने बंजारा वसाहतींत लेंगी गीतांचा आवाज घुमू लागला आहे. आठ दिवसांपासून समाजबांधव लेंगी गीतांवर ठेका धरत पारंपरिक पद्धतीने हा सण आजही साजरा करतात. विविध तांड्यांवर बंजारा बांधव एकत्र येऊन पूर्वापार पद्धतीने आपली होळी साजरी करीत आहेत.