न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर

न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
Published on: 
ABD26J83300 हिंगोली : विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी झालेले न्यायालयीन कर्मचारी. ----------- न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर ----- हिंगोली, ता. १७ : मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढ लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी मंगळवार (ता. १७) पासून न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील सुमारे अडीचशेवर कर्मचारी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गट (क), महाराष्ट्र ज्युडीशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य न्यायालय बेलिफ कर्मचारी महासंघ, राज्य न्यायालयीन गट (ड) कर्मचारी महासंघ या संपात सहभागी झाले. हा संप राज्यव्यापी राहणार असून, या संपाच्या माध्यमातून ३१ जानेवारी २०२५ रोजी लागू करण्यात आलेली उच्च न्यायालयाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी व वेतनवाढ जिल्हा, तालुका न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना लागू करावी, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीही न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते. परंतु, मागणीसंदर्भात निर्णय झाला नसल्याने आता बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला. या संपात जिल्हा न्यायायीलन बेलिफ संघटनेचे अध्यक्ष एल.ए. थोरे, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस.व्ही. देशमुख, महाराष्ट्र स्टेट ज्युडिसिअल स्टेनोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष ए.पी. देशमुख, बेलिफ संघटनेचे अध्यक्ष एल.ए. थोरे, न्यायालयीन गट (ड) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी.डी. बेंडके, एम.आर. कुलकर्णी, एस.बी. गायकवाड, आर.आर. ठाकूर, एम.टी. प्रधान, एम.व्ही. शिंदे, एस.पी. भालतिलक, पी.पी. केंद्रे, शेख सिकंदर, डी.डी. डोके, एन.बी. पुंड, व्ही.पी. कांबळे, के.के. गिरी, जी.के. काळे, व्ही.पी. धबडगे, ए.बी. खुपसे, जी.एस. चव्हाण, ए.के. जोशी, पी.एम. सोडेगावकर, एम.आर. सोनटक्के, शेख समीर, एन.आर. मनगे, एम.आर. कोरडे, एम.एस. कंठाळे, व्ही.एम. रेनेवाड आदी सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.