

Potters in Hingoli’s Gawalipura area prepare traditional clay diyas ahead of Diwali amid growing competition from electric lamps.
esakal
हिंगोली,: दीपावलीचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठेत सणाची चाहूल लागली आहे. आकाशकंदील आणि दीपावलीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या विक्रीची तयारी व्यावसायिकांकडून सुरू झाली आहे. दुसरीकडे, पारंपरिक मातीच्या पणत्या तयार करण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग वाढली आहे. मात्र, अलीकडच्या काळात आधुनिक इलेक्ट्रिक पणत्यांमुळे पारंपरिक पणत्यांच्या मागणी घटल्याचे कुंभार बांधवांचे म्हणणे आहे.