‘पदवीधर’साठी आज ३६ केंद्रावर मतदान

‘पदवीधर’साठी आज ३६ केंद्रावर मतदान
Published on: 
ABD26J81918 हिंगोली ः पदवीधर मतदार संघासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. यासाठी गुरुवारी अधिकारी साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झाले. --- ‘पदवीधर’साठी आज ३६ केंद्रावर मतदान -- स्थानिक निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण; प्रतिबंधात्मक आदेश लागू - हिंगोली, ता. २२ ः पदवीधर मतदार संघासाठी शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यातील ३६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक विभागाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून, गुरुवारी (ता.२२) पथक साहित्य घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले. मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाच्या रिंगणात प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही उतरले आहेत. या उमेदवारांना दोन आठवडे प्रचारासाठी मिळाले. या उमेदवारांनी आपापल्यापरीने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी (ता.२३) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी आठला मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार असून, सायंकाळी चारपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात असून, मतदान केंद्रावर कलम १६३ लागू करण्यात आले आहे. निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र व आजूबाजूचा परिसरात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. - २०० मीटर परिसरात प्रतिबंध मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाइल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक स्मार्ट घड्याळे, निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे, उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध राहणार आहे. --------------- मतदान केंद्र व परिसरात बंदोबस्त मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, याकरीता मतदान केंद्र आणि परिसरात ७२ पोलिस अंमलदार, १ पोलिस पेट्रोलिंग वाहन तैणात ठेण्यात आले आहे. याशिवाय पोलिस अधिकारीही मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. -------------- २३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान प्रक्रियेसाठी स्थानिक निवडणूक विभागाच्या वतीने २३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी १५, मतदान केंद्राध्यक्ष ४३, मतदान अधिकारी व कर्मचारी १३०, सूक्ष्म निरीक्षक ४२ अशी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. ------------ कळमनुरीत १८८२ जण बजावणार हक्क कळमनुरी ः तालुक्यातील सात मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ८८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कळमनुरी प्रा. शा. विकासनगर, प्रा. शा. जिल्हा परिषद गढीवरील (कळमनुरी), जि.प. प्रा. शा. (नांदापूर), जिल्हा परिषद शाळा (वाकोडी), जि. प. शाळा (आखाडा बाळापूर), जिल्हा परिषद शाळा (डोंगरकडा), जिल्हा परिषद शाळा (वारंगा फाटा) या सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेच्या नियोजनानुसार मतदान केंद्र अधिकारी आणि तीन सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. ----------- तालुकानिहाय मतदान केंद्र तालुका - मतदान केंद्र हिंगोली - १० कळमनुरी - ७ सेनगाव - ६ वसमत - ९ औंढा नागनाथ - ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com