होरपळून मृत्यू झालेल्या दोघांचीही ओळख पटली

होरपळून मृत्यू झालेल्या दोघांचीही ओळख पटली
Published on: 
फोटोसह ABD26J80822 हिंगोली ः शहरातील मारवाडी गल्ली भागातील फटाकाच्या साठ्यास सोमवारी आग लागली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागरिकांनी घटनास्थळी अशी गर्दी केली. ---------------- अग्नितांडवातील दोघांचीही पटली ओळख ------------------- हिंगोली दुर्घटनेत १४ जण जखमी; लाखोंचे नुकसान हिंगोली, ता.६ (बातमीदार) : शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरातील फटाक्याच्या साठ्यास सोमवारी (ता. पाच) रात्री लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.सहा) मृतांची ओळख पटली असून, या घटनेत भाजल्याने १४ जण जखमी झाले. मारवाडी गल्ली भागातील या अग्नितांडवात दोन मृतदेहांचा कोळसा झाल्याने ओळख पटत नव्हती. दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात ठेवण्यात आले होते. रात्रीपासूनच पोलिस मृतदेहांची ओळख पटावी यासाठी प्रयत्नात होते. मंगळवारी सकाळी दोन्ही मृतदेहांची ओळख पटली. एक मृतदेह विजयकुमार रामकृष्ण बासटवार (७६, रा.मारवाडी गल्ली, हिंगोली) यांचा, तर दुसरा मृतदेह अविनाश काशिनाथ बांगर (२६, रा. वंजारवाडा, हिंगोली) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. जखमींत राजगोपाल विजयकुमार बासटवार, श्रावणी राजगोपाल बासटवार, लता विजयकुमार बासटवार, भरत चौधरी, कपील खंडेलवाल, सय्यद मन्नान सय्यद सत्तार, अश्व चौधरी, कृष्णा अग्रवाल, सुनील बांगर, अनुप अग्रवाल, आयोध्या लक्ष्मीनारायण चौधरी (सर्व रा. हिंगोली) यांचा समावेश आहे. यातील काही जखमींवर खासगी, तर काहींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (चौकटीचा मजकूर) अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी जखमी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धावलेल्या हिंगोली न.प.च्या अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी भाजल्याने जखमी झाले. यात आकाश सांगळे यांची प्रकृती गंभीर असून, रवी कांबळे, दिलीप दोडके यांनाही दुखापत झाली आहे. या तिघांनाही उपचारासाठी लातूर येथील रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. ---------- सोनसाखळीवरून पटली ओळख दोनपैकी एका मृतदेहाच्या गळ्यात सोनसाखळी होती. ही सोनसाखळी नातेवाईकांनी विजयकुमार बासटवार यांचीच असल्याचे सांगितले. त्यावरून हा मृतदेह विजयकुमार रामकृष्ण बासटवार यांचा असल्याचे स्पष्ट झाले. ---- वाचविण्यासाठी गेलेल्या अविनाशचा दुर्दैवी मृत्यू या अग्नितांडवात मृत्यू झालेला अविनाश काशिनाथ बांगर हा युवक शहरातील एका कापड विक्रीच्या दुकानावर कामाला होता. दुकानापासून हाकेच्या अंतरावर आग लागल्याने अविनाशने घटनास्थळाकडे धाव घेतली. या दरम्यान अग्निशमन विभागाचा बंबही दाखल झाला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांसोबत अविनाशने घरात कुणी अडकले तर नाही ना, हे पाहण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान फटाक्याचा मोठा स्फोट झाला आणि अविनाशचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाला. विजयकुमार बासटवार यांना वाचविण्याच्या प्रयत्नात अविनाशलाही जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. --------- भरवस्तीत फटाक्याचा साठा; परवाना कुणाचा? हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकापासून गाडीपुरा, मारवाडी गल्ली, मेडीकल लाइन, चिंतामणी गणपती मंदिर परिसर या भागात दाट लोकवस्ती असून रस्तेही अरुंद आहेत. विजयकुमार बासटवार यांचे घरही मारवाडी गल्ली भागात असून, या ठिकाणी वरच्या मजल्यावर ते कुटुंबीयांसह राहत होते. खालच्या मजल्यावर त्यांनी फटाक्याचा साठा ठेवला होता. अरुंद रस्ते असलेल्या भरवस्तीत साठविलेल्या फटाक्यांच्या साठ्यास लागलेल्या आगीत दोन जीव गेले, तर १४ जण जखमी झाले. शिवाय लाखोंचे नुकसान झाले. या दुर्दैवी घटनेमुळे आता भरवस्तीत फटाक्याचा साठा करण्याचा परवाना होता का? असेल तर तो दिला कुणी? असा सवाल आता हिंगोलीकरांतून उपस्थित होत आहे. --------------- घरातील संसारोपयोगी साहित्य खाक बासटवार यांच्या घरातील फटाक्याच्या साठ्याला लागलेल्या आगीत तीन घरांचे नुकसान झाले. यामध्ये बासटवार यांच्यासह शैलेश नांदेडकर, भरत चौधरी यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले असून, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आग एवढी प्रचंड होती की घराच्या भिंती दुसऱ्या दिवशीही भट्टीसारख्या तापलेल्या होत्या. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com