Hingoli LPG Black Market: हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅसच्या काळाबाजारावर जिल्हाधिकारींच्या कडक कारवाईचे आदेश

Hingoli District Launches Special Teams to Curb Gas Black Market: हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅसच्या काळाबाजारावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सात विशेष भरारी पथके गठीत केली आहेत. हॉटेल, ढाबे, खानावळी आणि इतर व्यावसायिक वापरावरील कडक कारवाईचे आदेश दिले असून, अवैध साठेबाजी आणि रिफिलिंग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांना वेळेवर गॅस मिळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत.
Hingoli LPG Black Market

Hingoli LPG Black Market

esakal

Updated on

हिंगोली: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यासंदर्भात सात विशेष भरारी पथकांची स्थापना केली असून, घरगुती गॅसच्या अवैध व्यावसायिक वापरा विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com