उपसंचालकांनी घेतला आरोग्य संवाद यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा

उपसंचालकांनी घेतला आरोग्य संवाद यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा
Published on: 
उद्या आरोग्य संवाद यात्रा ------------- हिंगोली, ता. ३० (बातमीदार) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे सोमवारी (ता. दोन) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, या दौऱ्यादरम्यान आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या प्रशासकीय पूर्वतयारीचा आढावा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या आरोग्य सेवा उपसंचालिका डॉ. कांचन वानरे यांनी शुक्रवारी (ता. ३०) घेतला. जिल्हा प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आरोग्य संवाद यात्रेचे नियोजन व पूर्वतयारी, संबंधित आरोग्य संस्थांनी आपापल्या स्तरावरील नियोजन, समन्वय व जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, आरोग्य सेवांशी संबंधित आवश्यक माहिती व अहवाल अद्ययावत ठेवावेत अशा सूचना डाॅ. वानरे यांनी केल्या. तसेच जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील पायाभूत सुविधा व उपलब्ध आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य संस्थांमधील सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहायक संचालक डॉ. राहुल गीते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. सुनील देशमुख, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. बालाजी भाकरे आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.