हिंगोली शुक्रवारी रंगणार कवी संमेलन

हिंगोली शुक्रवारी रंगणार कवी संमेलन
Published on: 
हिंगोलीत शुक्रवारी रंगणार कविसंमेलन - गुंजन पाटील, सिंधुताई दहिफळे, नारायण पुरी, बबन शिंदेंची उपस्थिती हिंगोली, ता. २५ : सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व साहित्य सृष्टी फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात हे संमेलन पार पडणार असून, गुंजन पाटील, सिंधुताई दहिफळे, नारायण पुरी, बबन शिंदे आदी कवी उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनाचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, प्रा. नामदेव वाबळे, कलानंद जाधव, प्रा. विलास वैद्य, गणेश येवले, गोडाती काळे उपस्थित राहणार आहेत. प्रास्ताविक कवी रतन आडे, सूत्रसंचलन ॲड. जया करडेकर करणार आहेत. या संमेलनात कवी राजकुमार मोरगे, राजकुमार नायक, वाकोडे, राजाराम बनसकर, दिलीप धामणे, बबन मोरे, डॉ. राधिका देशमुख, सुमन दुबे, शिवाजी कऱ्हाळे, मदन अंभोरे, लक्ष्मण सूत, प्रा. संध्या रंगारी, डाॅ. अभय भरतीया, डाॅ. संजय नाकाडे आदी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील कवी सहभागी होणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, साहित्य सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष कवी विजय गुंडेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com