बालकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित बचपन अभियान

बालकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षित बचपन अभियान
Published on: 
ABD26J82435 हिंगोली : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने अनसूया विद्या मंदिर येथे सुरक्षित बचपन अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भ्रष्टाचार रोखण्याबाबत शपथ घेण्यात आली. ---------------- बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती - हिंगोली, ता. ३१ : बालकांचे लैंगिक शोषण रोखणे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथांविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समितीच्या वतीने अनसूया विद्या मंदिर येथे सुरक्षित बचपन अभियान राबविण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ संदर्भात अखिल भारतीय शालेय जनजागृती मोहिमेंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जी. दुबाले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा वकील संघाचे विधिज्ञ ॲड. डी.बी. खंदारे, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस.आर. घुगे, प्राचार्य पी.आर. गुरुसुडे उपस्थित होते. यावेळी ॲड. डी.बी. खंदारे यांनी विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याविषयी मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींसोबत जाणे टाळावे, अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत, वैयक्तिक अवयवांना चुकीच्या हेतूने स्पर्श केल्यास स्पष्टपणे विरोध करावा, तसेच अशा प्रकारचा अनुचित प्रसंग घडल्यास न घाबरता शिक्षक, पालक किंवा विश्वासू व्यक्तींना तातडीने सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. सहशिक्षक के.व्ही. सूर्यवंशी यांनी भ्रष्टाचार रोखण्याबाबत उपस्थितांना शपथ दिली. सहशिक्षक एस.एस. परांडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.