हिंगोली ते छ . संभाजीनगर तळणी

हिंगोली ते छ . संभाजीनगर तळणी
Published on: 
हिंगोली-छत्रपती संभाजीनगर थेट बससेवा सुरू करण्याची मागणी ----- तळणी, ता. २९ (बातमीदार) : हिंगोली ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान तळणीमार्गे थेट बससेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवाजी येऊल यांनी हिंगोली आगाराकडे केली आहे. या मार्गावर नवीन सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार झाला असूनही बससेवा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. हिंगोली, नर्सी नामदेव, सेनगाव, हट्टा, साखरा, कापडशिंगी, धानोरा फाटा, रायगाव, बन, देवठाणा, तळणी, गारटेकी, मंठा, वाटूर फाटा, विरेगाव, रामनगर, जालना, बदनापूरमार्गे छत्रपती संभाजीनगर अशी बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हा मार्ग हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव, मंठा आणि परतूर तालुक्यांतील ग्रामीण भागातून जातो. हिंगोली ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान कमी अंतराचा पर्याय असूनही या मार्गावर थेट बससेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बससेवा सुरू झाल्यास तळणीसह परिसरातील ५० ते ६० गावांतील नागरिकांना त्याचा लाभ होईल. बससेवेचा फायदा शेतकरी, शेतमजूर, लघुव्यावसायिक, कामगार आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच रुग्णांना उपचारासाठी, नागरिकांना न्यायालयीन कामांसाठी आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी ये-जा करणे सुलभ होईल. त्यामुळे हिंगोली आगाराने या मागणीचा विचार करून थेट बससेवा सुरू करावी, असे येऊल यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com